महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ShivSena issues whip: राज्यसभेसाठी खबरदारी, शिवसेनेचे व्हीप जारी - भाजप

१० जून रोजी राज्यसभेसाठी ( Rajya Sabha Election 2022 ) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्व आमदारांना व्हीप ( ShivSena issues whip for Rajya Sabha ) जारी केला आहे. तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून विधानभवनात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा सदस्यांनी मतदाच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहून दिलेल्या पक्षादेशाप्रमाने मतदान करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे व्हीप जारी
Shiv Sena issues whip

By

Published : Jun 8, 2022, 3:58 PM IST

मुंबई : राज्यसभेसाठी २४ वर्षांनी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने खबरदारी घेतली असून सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून विधानभवनात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १० जून रोजी मतदान ( Rajya Sabha Election 2022 ) होणार आहे. यंदा या निवडणूकीत कोल्हापूर केंद्रस्थानी आले आहे. दोन्हीही उमेदवार कोल्हापूरचे असून शिवसेनेकडून कट्टर कार्यकर्ते संजय पवार तर भाजपकडून माजी खासदार धनंजय महाडिक ( Sanjay Pawar and Dhananjay Mahadik )निवडणुकीच्या रिंगणात आहे. विजयासाठी प्रत्येकाला किमान ४२ मतांची गरज आहे. त्यामुळे शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला असून पक्षाने दिलेल्या निर्देश आणि आदेशानुसार मतदान करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचा पक्षादेश

काय व्हीपमध्ये :राज्यसभा निवडणुकीचे मतदान शुक्रवार दिनांक १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधानभवन, मुंबईत होणार आहे. शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांना १० जून रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४, विधानभवन, मुंबई या दालनात उपस्थित राहावे लागणार आहे. यावेळी सर्वांना मतदानाबाबतच्या सुचना देण्यात येणार आहे. या आमदारांना दिलेल्या सुचनाचे आमदारांना पालन करावे लागणार आहे. मतदान सर्वांना पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे. शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदाच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहून दिलेल्या आदेशानुसार मतदान करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा- Pankaja Munde : फडणवीसांशी 'पंगा' पंकजा मुंडेंना नडला..? राज्यसभेनंतर विधानपरिषदेचीही उमेदवारी नाहीच

ABOUT THE AUTHOR

...view details