महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हे कसले हिंदुत्वाचे पुजारी, हे तर सत्तेसाठी लाचारी -आशिष शेलार - Governor Bhagat Singh Koshyari

याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना ज्यांनी मुंबईचे पालकमंत्री केले. पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्शही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी आहेत, अशी टीका शेलार यांनी केली.

BJP leader Ashish Shelar
भाजपा नेते आशिष शेलार

By

Published : Oct 13, 2020, 2:56 PM IST

मुंबई - मंदिर उघडण्यावरून विरोधी पक्ष, राज्यपाल आणि सत्ताधारी यांच्यामध्ये जुंपल्याच पाहायला मिळत आहे. धार्मिक स्थळातील विश्वस्त व भाजपाकडून गेल्या महिन्यापासून मंदिरे उघडण्यासाठी मागणी होत आहे. याबाबत राज्यपाल यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मंदिरे का उघडली जात नाहीत? अशी विचारणा करतानाच उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे राज्यपालांना प्रत्युत्तर देत मंदिर उघडण्यासाठी नकार दिला. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी, हे तर सत्तेसाठी लाचारी आहेत, असे म्हणत टीका केली.

आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली; याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना ज्यांनी मुंबईचे पालकमंत्री केले; पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्शही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी आहेत, अशी टीका शेलार यांनी ट्विटरवरून केली.

तसेच पुढे शेलार म्हणाले की, “जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसले आहेत. यांनीच अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन ई-पद्धतीने करा, असे अनाहूत सल्ले दिले होते. तसेच “भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले. त्यांच्या कार्यक्रमाला हे निघाले होते

ABOUT THE AUTHOR

...view details