मुंबई - बिहार निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांची राजकीय समीकरणं समोर आली. महामारीच्या काळात घेण्यात आलेल्या या निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीए आघाडीचं पारडं जड असल्याचे चित्र आहे. मात्र, निवडणुकीत शिवसेनेने देखील विविध 22 विधानसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार उभे केले होते. आतापर्यंत लागलेल्या निकालावरून यातील सर्व मतदारसंघांमध्ये सेनेला सपाटून मार खावा लागला आहे. विजयाच्या जवळ जाणे दूर, मात्र काही ठिकाणी सेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. काही ठिकाणी सेनेच्या उमेदवारांना 'नोटा' पेक्षाही कमी मतं मिळाली. 22 जागांपैकी 21 मतदारसंघांमध्ये शिवसेनेवर ही वेळ ओढावली आहे. त्यामुळे विविध राजकीय नेते शिवसेनेला लक्ष्य करत आहेत.
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही सेनेवर टीका करत काँग्रेसला सल्ले देण्यापेक्षा स्वत:चे तोंड बंद करा, अशा आशयाचे ट्वीट केले आहे. सकाळीच सेनेचे खासदार संजय राऊत यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक केले होते. यानंतर हे ट्वीट आले आहे.
उमेदवार / मतदारसंघ / मिळालेली मतं / टक्के
- मनीष कुमार / पालीगंज / 252 / 0.21%
या मतदारसंघातून मार्स्कवादी लेनीन कम्युनिस्ट पक्षाचे संदीप सौरव हे 49 हजार 917 मतांनी विजयी झाले आहेत.
- ब्युटी सिन्हा / गया शहर / 238 / 0.28%
या मतदारसंघातून भाजपाचे प्रेम कुमार 40 हजार 887 मतांनी विजयी झाले आहेत.
- मृत्युंजय कुमार / वजीरगंज / 300 / 0.29%
या मतदारसंघातून भाजपाचे विरेंद्र सिंह 44 हजार 413 मतांनी विजयी झाले आहेत.
- संजय कुमार / चिरैय्या / 615 / 0.53%
या मतदारसंघातून भाजपाचे लालबाबू प्रसाद गुप्ता 45 हजार 002 मतांनी विजयी झाले आहेत.
- संजय कुमार(आयएनडी) / फुलपराश / 3317 / 2.47%
या मतदारसंघातून जदयुच्या शीला कुमारी 55 हजार 842 मतांनी विजयी झाल्या आहेत.
- संजीव कुमार झा / बेनीपूर / 757 / 0.46%
या मतदारसंघातून जदयुचे विनय कुमार चौधरी 61 हजार 322 मतांनी विजयी झाले आहेत.
- रंजय कुमार सिंह / तरैय्या / 856 / 0.6%