मुंबई : बेळगाव असो किंवा बंगाल निवडणूक असो, यावर भाष्य करण्याची संजय राऊत आणि शिवसेनेची औकात नाही अशी खोचक टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या या टीकेला शिवसेनेकडून आता काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगावच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता, त्या शुभम शेळकेचा पराभव झाला आहे असेही शेलार म्हणाले.
'बेळगाव आणि बंगालच्या निवडणुकीवर बोलण्याची शिवसेनेची औकात नाही'
बेळगावच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता, त्या शुभम शेळकेचा पराभव झाला आहे असेही शेलार म्हणाले.
भाजप कुणाला घाबरत नाही
शुभम शेळकेंच्या प्रचारासाठी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत बेळगावला गेले होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली होती. याचा आशिष शेलार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार प्राहार केला. बेळगाव असो किंवा बंगाल यावर बोलण्याची संजय राऊत आणि शिवसेनेची औकात नाही आहे. जे स्वत: कुबड्यांवर आहेत, ज्यांचं सरकार कुबड्यांच्या आधारावर उभं आहे आणि ज्यांचं पहिलं पाऊलही कुबड्यांच्या आधाराशिवाय पडू शकत नाही, अशा पक्षाने दुसऱ्याबद्दल बोलणं आणि दुसऱ्या पक्षाच्या यशाबद्दल बोलण्याची शिवसेनेची औकातच नाही आहे, अशी खोचक टीका शेलार यांनी केली आहे. राजकारणात यशाची भाषा करायची असेल तर एकटे यावे. नाही तर कोणाला घेऊन यावे, भाजप कोणाला घाबरत नाही, असं देखील शेलार म्हणाले.
काँग्रेस भुईसपाट
भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. आम्ही त्यांना पराभूत करू शकलो नाही हे खरं आहे. आम्हला पूर्ण विजय मिळाला नाही, पण यशाचे मोजमाप फक्त भाजपकडेच आहे. जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्तीबद्दल बोलले असतील तर त्यांची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली, असं आशिष शेलार म्हणाले.