मुंबई -मागच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनाच्या ( MH Assembly Winter Session 2021 ) दुसऱ्या दिवशी सरकारविरोधात पायर्यांवर घोषणाबाजी करणाऱ्या भाजप नेत्यांकडून मुख्यतः आमदार नितेश राणे यांच्याकडून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Nitest Rane Cat Voice On Aditya Thackeray ) यांची खिल्ली उडवण्यात आली होती. या संदर्भामध्ये शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत अशा पद्धतीने विधानभवनाच्या बाहेर किंवा त्या परिसरामध्ये गैरवर्तन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. तरीसुद्धा भाजप आमदार नितेश ( BJP MLA Nitest Rane ) राणे यांनी सिंधुदुर्ग येथे बोलताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांची चेष्टा मीच केली होती. हे जगजाहीर केले आहे. त्यासंदर्भात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे ( Shivsena MLA Suhas Kande ) यांनी विधानसभेत केली आहे.
'मीच तो आवाज काढला' -
राणे कुटुंबाकडून शिवसेना आणि ठाकरे कुटुंब यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. या संदर्भामध्ये मागच्याच आठवड्यात विधान भवनाच्या पायर्यांवर आंदोलन करत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनात प्रवेश करत असताना 'म्याऊ.. म्याऊ..', असा आवाज काढत त्यांची खिल्ली उडवली होती. हा मुद्दा शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेमध्ये धरून ठेवला होता. या बाबतीत अशा आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा केली होती. परंतु तरीसुद्धा नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये बोलताना तो आवाज मीच काढला होता, असं उघडपणे जाहीर केल्याने शिवसेनेला डिवचण्याचे काम पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांकडून झाले आहे. म्हणूनच नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुभाष कांदे यांनी आज विधानसभेत केली.
नितेश राणे यांना होणार अटक? -