महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

या देशात सामान्यांचे जगणे महाग आणि मरण स्वस्त झालंय ! शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

देशात सध्या जगण्यासाठी लागणारे अन्नधान्य महाग आणि मरण टाळण्यासाठी लागणारी औषधेदेखील महाग झाली आहेत. तेव्हा या दृष्टचक्रातून सामान्य माणसाने बाहेर कसे पडायचे ? असा प्रश्न सामनातून सरकारला विचारण्यात आला आहे.

saamna Editorial
सामनातून सरकारवर टीकास्त्र

By

Published : Dec 17, 2019, 9:50 AM IST

मुंबई -केंद्रातील सरकार देशातील जनतेचे जिणे सुसह्य करण्यासाठी सत्तेवर आले आहे की असह्य करायला? अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांचे भाव आकाशाला भिडलेलेच आहेत. त्यातच आता जीवनावश्यक औषधांच्याही दरवाढीचा दणका केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे या देशात सामान्यांचे जगणे महाग आणि मरण स्वस्त झाले असल्याचे टीका सामनातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.

हेही वाचा... नगराध्यक्ष अन् सरपंच जनतेतून थेट निवडण्याची पद्धत होणार रद्द..

मलेरिया, टीबीसह २१ औषधांच्या किमतीमध्ये राष्‍ट्रीय औषध मूल्‍य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) तब्बल ५० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता वाढ करण्यात आलेल्या औषधांची खरेदी रुग्णांना महागात पडणार आहे. वाढवलेल्या औषधांच्या किमतीमध्ये ऍन्टिबायोटिक, कुष्ठरोग, मलेरिया आणि टीबीच्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे. यावरून आता शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा... 'मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी', सोनिया गांधींची टीका

एकीकडे आर्थिक मंदीने रोजगारावर गदा आणली आहे. सरकार बरेच दावे करीत असले तरी मंदीमुळे सर्वच क्षेत्रांच्या बाजारपेठा सुस्तावल्या आहेत. रोजचे पोट भरायची जेथे मारामार तेथे इतर गोष्टींची खरेदी काय करणार? जनतेच्या खिशात पैसा असेल तरच खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. येथे या पैशालाच ओहोटी लागली आहे आणि दरवाढीची भरती थांबायची चिन्हे नाहीत, असा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना संपादकीयमधून सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली आहे.

हेही वाचा... राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न

एकीकडे अन्नधान्यही महाग आणि दुसरीकडे औषधेदेखील महाग, या दुष्टचक्रातून सामान्य माणसाने बाहेर कसे पडायचे? ज्या सरकारने बाहेर काढायचे ते सरकारच महागाईचे दणके देत त्याला त्या चक्रात ढकलते आहे. अन्नधान्य महागले म्हणून जगणे टाळा आणि जीवनावश्यक औषधे महागली म्हणून मृत्यूला जवळ करा, असे सरकारचे म्हणणे आहे काय? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details