महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'एनडीए'तून बाहेर काढणारे तुम्ही कोण? शिवसेनेचे भाजपवर सामनातून शब्द'बाण' - shivsena criticises bjp in saamna editorial

शिवसेना सतत प्रामाणिक होती, तरी शिवसेनेला मात्र सतत धोका देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेनेने हे सर्व आतापर्यंत सहन केले, मात्र यापुढे तसे होणार नसल्याचा इशाराही सामनातून देण्यात आला आहे..

सामना

By

Published : Nov 19, 2019, 8:11 AM IST

Updated : Nov 19, 2019, 8:39 AM IST

मुंबई -ज्या बाळासाहेबांनी 'मोदी' यांचा बचाव केला, त्याच बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडल्याची घोषणा करण्यात आली. शिवसेनेच्या वर्मावर बसलेला हा घाव किती जहरी होता, याची प्रचिती शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखावरून दिसून येत आहे. कोणत्याही बैठकी शिवाय आणि साधक बाधक चर्चेशिवाय शिवसेनेला 'एनडीए'तून बाहेर काढण्यात आले असून, शिवसेना हे कदापी सहन करणार नसल्याचे सामनात म्हटले आहे.

हेही वाचा... आठवलेंनी सुचवला नवा फॉर्म्युला; भाजपला मान्य असल्यास शिवसेनाही तयार

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी 17 नोव्हेंबरला, शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच शिवसेना महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह युती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षाच्या बाजूला जागा देण्यात येत आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले होते. एक प्रकारे शिवसेनेची 'एनडीए'तून म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून हकालपट्टी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती.

हेही वाचा.... पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीवर स्तुतीसुमने..

शिवसेनेने तेव्हा यावर बोलण्याचे टाळले होते. मात्र सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या सर्व खासदारांनी सरकारला अभुतपूर्व विरोध दर्शवला होता. यामुळे शिवसेना आणि 'एनडीए'मध्ये बिनसल्याचे जगजाहीर झाले होते. आज मंगळवारी सामनातून मात्र शिवसेनेने एनडीएतून परस्पर शिवसेनेला वगळण्याबाबत राग व्यक्त केला आहे. शिवसेना हा एनडीए या आघाडीचा संस्थापक सदस्य असून अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडीस, पंजाबचे बादल आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एनडीएची वीट रचल्याची आठवण शिवसेने करून दिली. एनडीएच्या कोणत्याही निर्णयाअगोदर बैठक आणि चर्चा हा शिरस्ता होता, मात्र तो आता पाळला जात नसून शिवसेनेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर काढल्याची केलेली घोषणा ही परस्पर केल्याचे सामनातून म्हटले आहे.

हेही वाचा... महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्य घोषित करा; शिवसेनेचे संसदेबाहेर आंदोलन

मनमानी आणि अहंकारी राजकारणाच्या अंताची ही सुरूवात

शिनसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची घोषणा म्हणजे मनमानी कारभार आणि अहंकारी रा़जकारणाच्या अंताची सुरूवात असल्याचे सामनात म्हटले आहे. जेव्हा देशात भाजपच्या विचारांमुळे कोणीही भाजपच्या जवळ जाऊ इच्छित नव्हते तेव्हा भाजपला जवळ करण्याचे काम शिवसेने केले होते. राज्यात युती आणि केंद्रात एनडीएची मुहुर्तमेढ त्यामुळेच रोवता आली होती. मात्र, आज शिवसेनेला न विचारता घेतलेल्या या निर्णयाचे परिणाम एनडीएला भोगावे लागतील असे सामनात म्हटले आहे. तसेच इतिहासातील दाखले देत, शिवसेनेला सतत धोका देण्याचा प्रयत्न करण्यात आला तरीही शिवसेनेने सर्व सहन केले आहे, मात्र यापुढे तसे होणार नसल्याचा इशारा यावेळी सामनातून देण्यात आला आहे.

Last Updated : Nov 19, 2019, 8:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details