महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Uddhav Thackeray : 'संजय राऊतांना अटक होऊ शकते; महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्याला...'; उद्धव ठाकरेंचा इशारा - संजय राऊत ईडी कारवाई

राऊतांना अटक करायचे सुरु आहे. दडपशाही सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्याला सोडणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी भाजपचे नाव घेता दिला ( uddhav thackeray on sanjay raut ed action ) आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

By

Published : Jul 31, 2022, 3:56 PM IST

Updated : Jul 31, 2022, 4:12 PM IST

मुंबई -गोरेगाव येथील 1 हजार 34 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी छापेमारी केली आहे. राऊत यांच्या घरी सकाळी ईडीचे 25 च्या वरती अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान दाखल झाले आहेत. राऊतांच्या घराची झाडाझडती सुरु असून, कागदपत्रांची छाननी केली जात आहे. तसेच, राऊतांचा चौकशी सुरु असून, त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊतांना अटक करायचे सुरु आहे. दडपशाही सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्याला सोडणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी भाजपचे नाव घेता दिला ( uddhav thackeray on sanjay raut ed action ) आहे.

'हिंदू, शिवसेनेचा गळा घोटण्याचा प्रकार' - उद्धव ठाकरे म्हणाले की, शेफारलेली माणसे तिकडे गेली. दमदाटी, लोभापायी जात ते तिकडे जात आहेत. संजय राऊतांच्या घरी ईडीचे पाहुणे बसले आहेत. संजय राऊत यांना अटक करायचे सुरु आहे. दडपशाही सुरु झाली आहे. जिवाला जीव देणारे शिवसैनिक बाळासाहेबांसोबत होते. महाराष्ट्राच्या मूळावर येणाऱ्याला सोडणार नाही. महाराष्ट्राचा अपमान खपवून घेणार नाही. बाळासाहेब, आनंद दिघे असे नव्हते. हिंदू, शिवसेनेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. कारस्थान मिटवून टाकायला हवा, असेही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

'दडपणाला घाबरणारा बाळासाहेब, दिघे साहेबांचा शिवसैनिक...' -दडपणाला घाबरणारा बाळासाहेब, दिघे साहेबांचा शिवसैनिक असणार नाही. मेलो तरी बेहत्तर शिवसेना सोडणार नाही, असे दिघे होते. अनेक वर्षे जेलमध्ये होते, घाबरले नाहीत. महाराष्ट्राच्या मातीचे शौर्य वीराला जन्म देण्याचे या लढ्यात विरोधात लढत राहू गरज पडल्यास रस्त्यावरही उतरू, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा -शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Last Updated : Jul 31, 2022, 4:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details