महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Uddhav Thackeray : 'संजय राऊत खरे पुष्पा, झुकेगा नहीं...'; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - उद्धव ठाकरे संजय राऊत मराठी बातमी

संजय राऊत माझा जुना मित्र आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, तो पत्रकार आहे निर्भीड बोलतो. तोही शरण गेला असता पण गेला नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं ( uddhav thackeray on ed arrested sanjay raut ) आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

By

Published : Aug 1, 2022, 3:48 PM IST

Updated : Aug 1, 2022, 4:17 PM IST

मुंबई -शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भेटी घेतल्यावर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजप निशाणा साधला आहे. संजय राऊत माझा जुना मित्र आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, तो पत्रकार आहे निर्भीड बोलतो. तोही शरण गेला असता पण गेला नाही. मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही, अशी त्याची भूमिका. संजय राऊत खरे पुष्पा, झुकेगा नहीं. प्रादेशिक पक्ष संपवण्याचे भाजपचे कारस्थान आहे. कोश्यारी आणि नड्डा यांचे वक्तव्य त्याचाच भाग, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली ( uddhav thackeray on ed arrested sanjay raut ) आहे.

'देशात दुसरे कोणते पक्षच नको, हुकूमशाही...' - उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची, हिंदूंमध्ये फूट पाडायची, मराठी अमराठी राजकारण करून स्वतःच्या राजकारणाच्या तुंबड्या भरून घ्यायचं, असे भाजपचे भेसूर कारस्थान जनतेसमोर आलेलं आहे. काल भाजपच्या अध्यक्षांचं पोटातलं ओठावर आलं, त्यांना या देशात दुसरे कोणते पक्षच नको आहेत. म्हणजे हुकूमशाही हवी आहे, असेही त्यांनी म्हटलं.

Last Updated : Aug 1, 2022, 4:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details