मुंबई -कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. तब्बल नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने संजय राऊतांना समन्स बजावले. त्यामध्ये ईडी कार्यालयात यावे लागेल, असे सांगण्यात आलं होते. त्यानुसार संजय राऊत ईडी कार्यालयात गेले आहेत. त्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र, राज्य सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. देशात इतक्या निर्लज्जपणे कारस्थान लाज, लज्जा सोडून दडपशाही, दमनशाही सुरू आहे. नव्याने हिंदुत्वाचा पुळका आलेले काही जण, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा गळा घोटण्याचे काम करत आहेत, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला ( uddhav thackeray angry ed detained sanjay raut ) आहे.
'आपण मोठं केले ते शेफारली आणि तिकडे गेली' - उद्धव ठाकरे म्हणाले, काही जणांना मातोश्रीने जरा जास्तच प्रेम दिलं होत आणि त्या प्रेमाचे काटे टोचायला लागले म्हणून आता पलिकडे गेले. बरं गेले ते गेले मातोश्रीहून दिल्लीला पळतात. काल सुध्दा कसे पळालेत ते पहायला मिळाले, अडीच वर्षात असं कधीही झाल नव्हतं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिमाखाने शानदारपणे राज्य करण्याचा प्रयत्न केला. कोणतही दडपण माझ्यावरती नव्हतं, कुणीही बेल वाजवल्यानंतर जर जेवत असलो तर जेवण अर्धवट टाकून पळत या की पळत जाणारा मी मुख्यमंत्री नव्हतो. मात्र, आता पुन्हा एकदा काही काळापुरती का होईना हीच परिस्थिती महाराष्ट्रावरती ओढावली आहे. ज्यांना आपण मोठं केले ते शेफारली आणि तिकडे गेली, अशी टीकाही बंडखोर आमदारांवर ठाकरेंनी केली आहे.
'शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना...' -लोभापायी, दमदाटीपायी तिकडे जाताहेत, आता काल सुध्दा आपल्यातला एक तिकडे गेला त्याची प्रतिक्रिया पाहिली. कशासाठी लोक चाललीय? दुसरा मुद्दा काल मी एक पत्रकार परिषद घेतली कशासाठी घेतली होती? राज्यपालांच्या विरोधात नाही, कोश्यारीच्या विरूद्ध! त्यांना राज्यपालपदी बसण्याचा अधिकार राहिलेला नाही. राज्यपाल म्हणजे हे पद फार मोठ आहे. त्या पदाचा मान जसा आपण राखतो तसा त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने तो राखण्याची गरज आहे. भाजपचे जे कारस्थान आहे हिंदूंमध्ये फुट पाडायची मराठी अमराठी करायचं, मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि शिवसेना का संपवायची तर हिंदूंना आणि मराठी माणसांना ताकद देणारी ही संघटना ही एकदा संपली की महाराष्ट्र यांना चरायला मोकळा झाला. मोकळ कुरण मोकळ पडलय चरत बसा. कुरण म्हणजे गवत. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना एकदा का नातं तुटलं, तुटू शकत नाही. त्यांच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी ते तुटू शकत नाही. तुटणारच नाही पण त्यांच्या प्रयत्नच तसा आहे की शिवसेना आणि ठाकरे नातं एकदा तोडलं की ती जी राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.