महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी - शिवसैनिकांकडून बाळासाहेबांना अभिवादन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

shivsena chief balasaheb thackeray birth aniversary
शिवसैनिकांकडून बाळासाहेबांना अभिवादन

By

Published : Jan 23, 2020, 1:21 PM IST

मुंबई -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी सकाळपासूनच शिवसैनिकांनी शिवतीर्थावर गर्दी केली. दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर शिवसैनिकांनी गर्दी केली. त्यातही शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह पहायला मिळाला.

शिवाजी पार्क येथे शिवसैनिकांकडून बाळासाहेबांना अभिवादन

हेही वाचा... मनसेची 'शिवराजमुद्रा', राज ठाकरेंच्या हस्ते नव्या झेंड्याचे अनावरण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्त शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यामुळे यंदाच्या जयंतीला वेगळेच महत्व प्राप्त झाले. गुरुवारी सकाळपासूनच महाविकास आघाडीचे मंत्री छगन भुजबळ, अजित पवार यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. वांद्रे येथील 'बिकेसी' येथे शिवसेना जल्लोष सोहळा आयोजित केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार सोहळा शिवसैनिकांकडून करण्यात येणार आहे.

हेही वाचा... शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभर अभिवादन!

ABOUT THE AUTHOR

...view details