महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Salman khurshid book controversy : शिवसेना, भाजप आक्रमक तर काँग्रेस वक्तव्यावर ठाम! - हिंदूंची केली दहशतवादी संघटनांशी तुलना

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सलमान खुर्शीद यांच्या लिखाणावर आक्षेप घेत त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय. तसेच सलमान खुर्शीद हे पुरुष वेशातील कंगना राणावत असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी सलमान खुर्शीद यांच्यावर केली आहे.

Salman khurshid
Salman khurshid

By

Published : Nov 13, 2021, 11:13 PM IST

मुंबई -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या पुस्तकात हिंदूंची तुलना ISISI आणि बोको हराम दहशतवादी संघटनांशी केल्यानंतर शिवसेना आणि भाजप खुर्शीद यांच्या वक्तव्यावर टीका केली असून काँग्रेस मात्र समर्थन करताना दिसतात.

राजू वाघमारेंची प्रतिक्रिया
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी 'सनराईज ओव्हर अयोध्या- नेशनहूड इन अवर टाईम्स' या पुस्तकामध्ये हिंदूंच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह लिखाणा नंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटलेले पाहायला मिळतायात. सलमान खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकातून हिंदुत्वची तुलना ISISI किव्हा बोको हराम प्रमाणे या दहशतवादी संघटनेशी केली आहे. त्यांच्या या लिखाणावर देशभरातून टीका होत असून महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून देखील त्यांच्या या लिखाणाचा समाचार घेण्यात आला आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडूनही सलमान खुर्शीद यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सलमान खुर्शीद यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस मात्र अडचणीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळतेय.
Priyanka chaturvedi
शिवसेनेकडून सलमान खुर्शीद यांच्यावर टीकाशिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सलमान खुर्शीद यांच्या लिखाणावर आक्षेप घेत त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय. तसेच सलमान खुर्शीद हे पुरुष वेशातील कंगना राणावत असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी सलमान खुर्शीद यांच्यावर केली आहे. तसेच सलमान खुर्शीद यांची काँग्रेसमध्ये जुनेजाणते नेते म्हणून ओळख आहे. मात्र त्यांच्या या लिखाणामुळे राहुल गांधींना अडचणीत टाकण्याचं काम केलं जातंय. त्यांनी केलेली तुलना देशाचा अपमानच आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तिथेच शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच त्यांच्या या लिखाणामुळे लाखो हिंदूंची मन दुखावले गेले असल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून सांगितला आहे.
Nitesh rane
खुर्शिद यांना ISISI च्या हवाली करा - नितेश राणे सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकामध्ये हिंदूची केलेली ISISI आणि बोको हराम या दहशतवादी संघटनेशी तुलने नंतर भारतीय जनता पक्षाने देखील सलमान खुर्शीद यांच्यावर तिखट टीका केली आहे. सलमान खुर्शीद यांच्या सारख्या लोकांना ISISI सारख्या दहशतवादी संघटनांच्या हवाली केलं पाहिजे. त्यानंतर दहशतवादी संघटना आणि हिंदुत्व मध्ये काय फरक आहे याची जाण त्यांना होईल अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सलमान खुर्शीद यांच्यावर केली आहे. हिंदुत्व ही एक जीवनशैलीसर्वोच्च न्यायालयाच्या 1995च्या निकालानुसार हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे. सलमान खुर्शीद यांनी हिंदू धर्मावर टीका केलेली नाही, तर जीवनशैलीवर टीका केली आहे. देशात मोदी सरकार आल्यानंतर मॉब लिंचींग सुरू झाली, दंगली घडवल्याचेही सत्कार करण्यात आले. हे सर्व प्रकार सत्यात कोड आल्यानंतर सुरु झालं हे लक्षात घेतल्यास सलमान खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या वक्तव्या नुसार याचं उत्तर प्रत्येकाला मिळेल. देशात आर एस एस ने केवळ द्वेष पसरवण्याचे काम केला आहे. त्यामुळे सलमान खुर्शीद यांनी पुस्तकातून केलेल्या वक्तव्याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे असे मत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details