महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट' नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड - मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळावला अदानी विमानतळ फलक

मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध केला असून तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करत तिथून हटवला आहे.

airport adani airport board
airport adani airport board

By

Published : Aug 2, 2021, 3:04 PM IST

Updated : Aug 2, 2021, 8:33 PM IST

मुंबई -मुंबई विमानतळावर अदानींचा नामफलक शिवसैनिकांनी तोडला आहे. अदानी एअरपोर्टच्या फलकाला शिवसेनेने जोरदार विरोध केला आहे. मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध केला असून तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करत तिथून हटवला आहे. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक लावले होते. त्याला शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला असून नामफलकाची तोडफोड करण्यात आली. या ठिकाणी सध्या मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

काय आहे पार्श्वभूमी -

मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती.

मुंबई विमानतळावर अदानींचा नामफलकाची शिवसैनिकांकडून तोडफोड

विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा अदानी कंपनीकडे गेल्यामुळे अदानी एअरपोर्ट्स बोर्ड -

विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी यांच्या कंपनीकडे गेल्यामुळे त्याठिकाणी अदानी एअरपोर्ट्स अशा नावाचे बोर्ड लावण्यात आले होते. हे सर्व बोर्ड्स आज शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. अदानी उद्योग समूहाने मुंबई विमानतळाला 'अदानी एअरपोर्ट्स' असे नाव लावले होते. या संदर्भात अनेक तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या होत्या. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आणि भारतीय कामगार सेनेने विमानतळाला लावलेले अदानी एअरपोर्ट्सचे नामफलक फोडून टाकले.

प्रतिक्रिया देताना शिवसैनिक

मुंबई एअरपोर्ट तोडफोड प्रकरण : अदानी आजारी ग्रुपकडून स्पष्टीकरण

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असलेल्या वादग्रस्त अदानीच्या बोर्डची शिवसैनिकांनी तोडफोड केली. या विमानतळाचे काम अदानी व्यवस्थापनाला मिळाल्यानंतर "अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केली. या प्रकरणाबाबत अदानी ग्रुपमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.

अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड विमानतळाचा ताबा मिळाल्यानंतर पूर्वीच्या जीव्हीके कंपनीच्या जागी आपले ब्रँडिंग करत आहे. केवळ जीव्हीकेच्या ब्रँडिंगची जागा अदानी विमानतळ कंपनीने घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावात वा टर्मिनलच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे कंपनीच्यातर्फे सांगण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण यांचे निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सर्वकाही करण्यात आलेले आहे. अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड कंपनी विमान वाहतूक समुदायाच्या हितासाठी सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन यापुढेही करत राहील, असेही पुढे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे बोर्ड लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे बोर्ड लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करत आज या बोर्डची तोडफोड करण्यात आली. शिवसेना खासदार अरविंद सावंत याने देखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती व या तोडफोडीचे समर्थन केले होते.अदानीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या टी-शर्ट्सवर अदानी विमानतळ लिहिलं आहे. दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं महाराजांचं नाव लिहले आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. सांगूनही जेव्हा दुर्लक्ष केलं जातं तेव्हा अशी प्रतिक्रिया दिली जाते. तो काय अदानी विमानतळ आहे का ? याआधी असणाऱ्या जीव्हीकेने असे बोर्ड लावले होते का?,” असा सवालही अरविंद सावंत यांनी उपस्थित केला होता.

Last Updated : Aug 2, 2021, 8:33 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details