मुंबई - विकास कामे मोठ्या प्रमाणात रखडल्याने सत्ताधारी काँग्रेससह शिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज ( Shivsena 90 Percent MLA Not Happy ) असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे ( Bjp Leader Chandrashekhar Bawankule ) यांनी केला आहे. एकीकडे काँग्रेसचे २५ आमदार नाराज असून, आता शिवसेनेचे ९० टक्के आमदारही नाराज असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते भारतीय जनता पार्टीच्या मुंबई कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेना व काँग्रेसच्या आमदारांची कामे रखडली? - महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेसाठी तीनही पक्ष एकत्र आले. परंतु, त्यांच्यातील अंतर्गत वाद अजूनही कायम आहेत. शिवसेना व काँग्रेसच्या आमदारांची कामे खोळंबली असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत १०० जागा निवडून येतील, असा अंदाज याच नाराजीच्या भरवशावर जाहीर केला. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांची नाराजीच त्यांना फायद्याची ठरणार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला माहिती असल्याचा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.