महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 18, 2022, 12:13 PM IST

Updated : Aug 18, 2022, 12:27 PM IST

ETV Bharat / city

संजय राऊत यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टसमोर हजर राहण्याचे शिवडी कोर्टाचे आदेश

संजय राऊत यांनी मेधा पाटकर यांच्यावर मीरा भाईंदर इथे शौचालय बांधण्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. संजय राऊत यांना Sanjay Raut ED arrest पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून करण्यात आले आहे.

संजय राऊत किरीट सोमैय्या
संजय राऊत किरीट सोमैय्या

मुंबई संजय राऊत यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टसमोर हजर राहण्याचे शिवडी न्यायालयाने Shivdi Court orders Sanjay Raut आदेश दिले आहेत. किरीट सोमैय्या यांची पत्नी मेधा सोैमय्या Medha Somaiya case in court यांनी संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केला आहे. संजय राऊत यांना आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे 12.30 वाजता कोर्टासमोर हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने जेल प्रशासनाला दिले आहे. या प्रकरणात जबाब नोंदवण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी मेधा पाटकर यांच्यावर मीरा भाईंदर इथे शौचालय बांधण्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. संजय राऊत यांना Sanjay Raut ED arrest पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून करण्यात आले आहे.

संजय राऊत यांनी केले होते आरोप : किरीट सोमय्या यांनी कुटुंबांच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मिरा- भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा घोटाळा झाला आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. तसेच ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पहा. विक्रांतपासून ते इथपर्यंत असा टोला राऊत यांनी लगावला होता. सोमय्या आणि त्याचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळ्याची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल, अस संजय राऊत म्हणाले होते.

किरीट सोमय्या यांनी केला होता मानहानीचा दावा :सोमय्या म्हणाले की, हा मानहानीचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी केला आहे. दोन वर्षांपासून महा विकास आघाडी सरकारमधील नेते व मंत्री यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढण्याचे काम सातत्याने करत आहेत. त्यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे कारागृहात आहेत,ठाकरे सरकार मधील एक डझन मंत्री व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. मी कुठल्याही चौकशीला तयार असून संजय राऊत यांच्या वरील मानहानीचा खटला हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचाBanshidhar Temple गढवा येथील बंशीधर मंदिरात 1280 किलो शुद्ध सोन्याची भगवान श्रीकृष्णाची मूर्ती

Last Updated : Aug 18, 2022, 12:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details