मुंबई- भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराला राज्य सरकार जबाबदार आहे. जे घडले ते लोकशाहीसाठी दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आपल्या कार्यालयात ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
लोकशाहीत कुणी कुणाकडे प्रचाराला जावे यावर बंधन नाही. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना प्रचारासाठी येऊ न देण्याची भूमिका घेतली. बॅनर्जी यांची भूमिका योग्य नाही. ममतांना गुजरातमध्ये जाण्यापासून कोणी रोखले होते का ? असा सवालही राऊत यांनी केला.
तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या दंग्यात ईश्वरचंद्र विद्यासागरांचा पुतळा तोडण्यात आला. हे ही दुर्दैवी असल्याचेही राऊत म्हणाले.
एनडीएचे सरकार येईल....