मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली मै भी चौकीदार ही संकल्पना चांगली आहे. मात्र मला चौकीदार होण्याची गरज नाही, मी शिवसैनिक असल्याचे ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे म्हणतात... मी नाही चौकीदार ! - खासदार संजय राऊत
मला चौकीदार होण्याची गरज नाही, मी शिवसैनिक असल्याचे ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ठाकरे यांनी विविध विषयावर रोखठोक उत्तरे दिली. मै भी चौकीदार या विषयावर राऊत यांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ठाकरे यांनी सैनिक हा सैनिक असतो, त्यामुळे तो सदैव जनतेचे रक्षण करतो. असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली. यावर राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे यांनी घोषणा देणे वेगळे आहे. मात्र काँग्रेसमुक्त भारत करणे शक्य नसल्याचे सांगितले.
देशातील नागरिकांना १५ लाख रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मात्र निवडणूक संपल्यानंतर अद्यापही नागरिकांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता, त्यांनी जनतेला १५ लाख रुपये देण्याची योजना अवाजवी होती. आपण एखादी गोष्ट बोलतो तेव्हा जनतेला आपल्याकडून अपेक्षा असतात. मात्र त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर असंतोष वाढत जातो असेही ठाकरे यावेळी म्हणाले.