मुंबई- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर ढाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्यांदाच शिवसेनेच्या वाट्याला राज्यपाल पद आले आहे.
शिवसेना नेते लिलाधर ढाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नेमणूक
भाजप आणि शिवसेनेने महायुती करुन राज्यात यश मिळवले आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळात मात्र शिवसेनेला एकच मंत्रीपद देण्यात आले आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते लिलाधर ढाके यांची मिझोरमच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.
एनडीएत मोठा घटक पक्ष असताना देखील केवळ एकच मंत्रीपद शिवसेनेला देण्यात आले. त्यातही अवजड उद्योग मंत्रीपद हे शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना देण्यात आले. यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेला शांत करण्यासाठी लिलाधर ढाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आल्याचे बोलले जाते.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मित्र व घटक पक्षांना महत्त्वाचे स्थान दिले जात होते. मात्र आता घटक पक्षांबाबत भाजप आक्रमक झालेली दिसत असल्याचे दिसून येत आहे.