मुंबईमाटुंगा येथील डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल अँड चिल्ड्रन होममध्ये मंगळवारी सायंकाळी 4 अल्पवयीन मुलांनी 16 वर्षीय मतिमंद मुलाची बेदम मारहाण करून हत्या केली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. 12 ते 17 वयोगटातील चारही मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Crime या प्रकरणाचा तपास करत असलेल्या शिवाजी पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मुले बालगृहाच्या कॉमन हॉलमध्ये जमली आणि त्यांनी 16 वर्षांच्या मुलाला वारंवार लाथा-बुक्क्याने मारहाण केली.
माटुंग्यात मतिमंद मुलाची हत्या प्रकरणी ४ अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल - Mumbai Police
06:38 August 20
Mumbai Crime मतिमंद मुलाची हत्या प्रकरणी ४ अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा
सायन रुग्णालयात दाखल या हल्ल्यात पीडित मुलगा बेशुद्ध पडला आणि या अवस्थेत तो बालगृहाच्या वॉर्डनला सापडला. त्याला तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याला 'मृत' घोषित करण्यात आले आहे.
पोलिसांची चौकशीला सुरुवातरुग्णालयातून मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र, बुधवारी शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्यास दुखापत झाल्याचे लक्षात आले. डॉक्टरांच्या मते, मुलाचा मृत्यू गंभीर अंतर्गत जखमांमुळे आणि आघाताने झाला आहे. यानंतर पोलीस आणि बालगृहाच्या अधिकाऱ्यांनी इतर लोकांची चौकशी केली.
खुनाचा गुन्हा दाखलया घटनेच्या वेळी हॉलमध्ये सुमारे 12 ते 15 मुले असल्याचे त्यांना आढळले. मृत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एकाने पोलिसांना सांगितले की, 4 मुलांपैकी कोणत्या मुलाने मृताला मारहाण केली. प्राथमिक तपासात त्याची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी या चौघांनाही डोंगरी रिमांड होममध्ये पाठवण्यात आले असून तेथे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मुलांना ठेवण्यात आले होते.
हेही वाचाPregnant Woman Yavatmal गर्भवती महिलेची आरोग्य केंद्राच्या दारात प्रसुती, अर्भकाचा मृत्यू