महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेना शाखांमध्ये शिवसैनिकांना ऑक्सिजन हाताळण्याचे प्रशिक्षण देणार

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील गरजू रुग्णांसाठी तात्काळ प्राणवायू (ऑक्सिजन) व्यवस्था होण्याकरिता विधानसभा निहाय प्रत्येकी दोन असे एकूण 6 ऑक्सिजन बेडची व्यवस्था शिवसेना शाखांमध्ये करण्यात आली आहे.

Shiva sena mumbai
शिवसेना शाखा मुंबई

By

Published : Jun 11, 2020, 6:20 PM IST

मुंबई - शिवसेना युवासेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील गरजू रुग्णांसाठी तात्काळ प्राणवायू (ऑक्सिजन) व्यवस्था होण्याकरिता विधानसभा निहाय प्रत्येकी दोन असे एकूण 6 ऑक्सिजन बेडची व्यवस्था शिवसेना शाखांमध्ये करण्यात आली आहे. गरजू रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत ऑक्सिजन पुरवठा हाताळण्याचे प्रशिक्षण आता शिवसेनेच्या शाखांमधील शिवसैनिकांना देण्यात येणार आहे.

विभागांमधील गरजू रुग्णांना कित्येक वेळा ऑक्सिजनची उपलब्धता होत नसल्याने हाल होत असल्याचे समोर आले. ऑक्सिजनअभावी रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा वेळेस शाखेतील शिवसैनिकांना ऑक्सिजन बेडचे व्यवस्थापन हातळण्याकरिता योग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच रुग्णांना योग्य वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करून त्वरित रुग्णालयामध्ये व्यवस्था करण्याचे काम सुद्धा शाखां मार्फत करण्यात येणार आहे.

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ चे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ व शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या सहकार्याने सदर ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज ऑक्सिजन बेडचे वाटप शिवसेना ठाकूरद्वार शाखा क्र. २२२ येथे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपविभाग प्रमुख संपत ठाकूर, सरिता तांबट, शाखा प्रमुख दिपण मोघे, माधुरी पेंढारे, युवासेना विधानसभा संघटक प्रथमेश सकपाळ, कार्यालय प्रमुख यशवंत कोळेकर व शिवसैनिक उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details