मुंबई - अंधेरी पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८१ मधून निवडून आलेल्या भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र लघुवाद न्यायालयाने अवैध ठरवले आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून नियुक्तीस आज मान्यता दिली. यामुळे शिवसेना नगरसेवकांची संख्या ९७ वर जाणार आहे. याबाबत ११ फेब्रुवारीला पालिकेच्या सभागृहात घोषणा केली जाणार आहे.
पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८१ मधून निवडून आलेल्या भाजपच्या मुरजी पटेल यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत या प्रभागात दुसर्या क्रमांकाची मते मिळवणार्या शिवसेनेच्या संदीप नाईक यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तपासणीत पटेल यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सिद्ध झाल्याचे समितीने पालिकेला कळवले होते. त्यामुळे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जुलै २०१९ला पालिका सभागृहात मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणुकीबाबत न्यायमुर्ती स्वर्णिता महाले यांनी संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून घोषणा करण्यासंदर्भात याचिका मान्य करून त्यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्याचे निर्देश पालिकेला दिले.