मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या ( Sanjay Raut Alleged Kirit Somaiya ) यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी भ्रष्टाचाराचा ( INS Vikrant Fund Scam ) आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी या आरोपाचे खंडन केले ( Devendra Fadnavis On INS Vikrant Fund Scam ) आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले, या अगोदरसुद्धा किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी व त्यांच्या आघाडी सरकारने अनेक आरोप केले. परंतु शेवटी त्यातून काही निष्पन्न झाले नाही. ते भाजपा स्थापना दिवसाच्या ( BJP Foundation Day 2022 ) कार्यक्रमानिमित्त मुंबईत बोलत होते.
भावनिक उत्तर नको? : याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांनी असे अनेक हास्यास्पद आरोप किरीट सोमय्या यांच्यावर केले आहेत. ते नवनवीन प्रयत्न करत आहेत. ते कुठे कुठे काय काय करणार आहेत हे आम्हाला अगोदरोपासूनच माहीत आहे. किरीट सोमय्या यांच्या मुलाला सुद्धा यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पोलिसही जाणतात अशा पद्धतीचा एफआयआर होऊ शकत नाही. तरीसुद्धा ते वारंवार प्रयत्न करत आहे. परंतु आम्ही त्याला कायद्याने उत्तर देऊ. संजय राऊत यांच्यावर जी काही कारवाई होत आहे त्याला त्यांनी कायद्याने उत्तर द्यावे. भावनिक मुद्दा उपस्थित करून अशा पद्धतीने पळवाट काढणे हे गैर असल्याचे ही देवेंद्र फडणवीस म्हणाले.