मुंबई- बंडखोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान देत, भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आज आयोजन ( Shiv Senas National Executive meeting) केले आहे. दुपारी शिवसेना भवनात १ वाजता ही बैठक पार पडणार ( Shivsena Bhavan ) आहे.
शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत बंडखोर आमदारांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता ( Shivsena on rebel MLAs ) आहे. शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, खासदार, आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे आघाडी सरकार डळमळीत झाले ( Impact of Rebel MLA Eknath Shinde ) आहे. सरकार टिकवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांविरोधात कारवाई तसेच सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेच याबाबत कायदेशीर लढाई आदी मुद्द्यांवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. बैठकीत मंथन केले जाणार आहे.
शिवसेनेच्या बंडखोरांवर होणार कारवाई?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेत्यांमध्ये राज्यातील सत्तासंघर्षावर खलबते झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी एकीकडे मातोश्रीवर ही बैठक पार पडत असतानाच दुसरीकडे विधान भवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठीही हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. याबाबत कायदेशीर मार्गाने लढाई लढण्यासाठी राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांचीही मदत घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना आगामी काळात काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.