मुंबई- शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठल्यानंतर कोणती निशाणी आगामी निवडणुकीत घ्यायची हा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या १९७ चिन्हांतही वाघ, तलवार आणि ढाल हे चिन्ह वगळले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता चिन्ह घेणार याकडे ( Eknath Shinde party sign selection ) सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गट गदा किंवा बाळासाहेबांची ओळख असलेली रुद्राक्षमाळ घेण्याची शक्यता आहे. तर शिंदेंना निवडणूक आयोगाने रिक्षा हा पर्याय उपलब्ध करून दिल्याने ते हेच चिन्ह घेऊन रिंगणात उतरण्याची ( Uddhav Thackeray group ) शक्यता आहे. दोन्हीकडून वेगळी रणनीती ठरवली जात आहे.
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेपुढे मोठे संकट उभे ( Thackeray groups selection of party sign ) ठाकले आहे. शिवेसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाने शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केला. त्यामुळे दोघांना कोर्टाची पायरी चढावी लागली. अखेर शिवसेना कोणाची या वादावर तोडगा निघेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठविले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक तोंडावर आले असताना निवडणूक आयोगाने केली भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आहे. मात्र, आगामी निवडणुकीत नवा चिन्ह घेऊन ठाकरे आणि शिंदे यांना रिंगणात उतरावे लागणार आहे.
शिंदेंना चिन्हाचा पर्याय; ठाकरेंचे काय?केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण गोठवले असून दोन्ही गटाला १९७ चिन्हांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी एका चिन्हाची निवड दोघांनाही करावी लागेल. परंतु ठाकरेंना अपेक्षित असलेले ढाल, तलवार किंवा वाघ अशा प्रकराचे कोणतेही चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत. मात्र, शिंदेंना रिक्षा हा पर्याय या उपलब्ध असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता चिन्ह वापरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.