मुंबई -शिवसेनेचे 39 आमदार आपल्या सोबत नेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जबर धक्का दिला. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आपल्या बाजूने वळवून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत खाली खेचण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. पक्षात झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणारी आहे. मात्र यापुढे पक्षात बंड होऊ नये यासाठी शिवसेना पक्षाकडून आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याकडून पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचे प्रमाणपत्र लिहून घेतले जात आहे. आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत देखील पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र लिहून घेतले गेल्याची माहिती मिळत ( Shiv Sena Workers Loyalty Certificate ) आहे. या आधीही शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून शिवबंधन बांधले जात होते.
उद्धव ठाकरे यांच्या सोबत - मात्र हे प्रमाणपत्र शिवसेनेचे पदाधिकारी स्वतःहून उद्धव ठाकरे यांच्याकडे देत आहेत. पक्षाचे झालेले एवढे मोठे बंड बचत शिवसेनेचे पदाधिकारी स्वतःहून आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत हे दाखवून देण्यासाठी हे प्रमाणपत्र देत असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.