मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्र्यांची बैठक झाली. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.
निवडणुकीच्या कामाला लागा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच आगामी निवडणुका आणि रखडलेल्या कामांसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर, शंकरराव गडाख, संजय राठोड हे मंत्री हजर होते. तर इतर मंत्री बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते.
या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबत एकत्र लढण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सत्तार यांनी दिली. या बैठकीत शिवसेना मंत्र्यांचे प्रश्न होते ते मांडण्यात आले. त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. तसेच निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती संजय राठोड यांनी दिली.
तर भाजपला निवडणुका अवघड -