मुंबई - 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यावर बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांकडून विजय आमचाच होईल, न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेच्या आमदारांकडून देखील न्यायालयाचा निकाल लोकशाहीच अस्तित्व ठरवेल. अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
Shiv Sena Vs Eknath Shinde: 'देशात लोकशाही आहे की नाही? की त्याची हत्या झाली निकाल येईल' आजच्या सुनावणीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया
11:41 July 11
'देशात लोकशाही आहे की नाही? की त्याची हत्या झाली निकाल येईल' आजच्या सुनावणीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया
11:25 July 11
सुनावणी पूर्ण होईपर्यंत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेऊ नये
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण होईपर्यंत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
11:10 July 11
विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण प्रलंबित असताना कोणताही निर्णय घेऊ नये- सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरलला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयाने निर्णय घेतल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्यास सांगण्यास सांगितले. या प्रकरणासाठी खंडपीठाची स्थापना आवश्यक आहे. सूचीबद्ध होण्यासाठी थोडा वेळ लागेल. प्रकरण उद्या सूचीबद्ध होणार नाही.
11:03 July 11
Shiv Sena Vs Eknath Shinde : 'देशात लोकशाही आहे की नाही? की त्याची हत्या झाली निकाल येईल' आजच्या सुनावणीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया
बंडखोर 16 आमदारांना निलंबित करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्यासह शिवसेनेतील 16 आमदारांबाबत आज सुप्रिम कोर्टात ( Supreme Court ) निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेने या 16 आमदारांविरोधात निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. मात्र, त्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. यासोबतच शिवसेनेने एकनाथ शिंदे सरकार स्थापनेला आणि शिंदे सरकारने बहुमत चाचणी घेण्याच्या राज्यपालांच्या निर्णयांनाही आव्हान दिले आहे. या याचिकांवरही सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.