मुंबई राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस ( Shinde-Fadnavis Government ) ( Deputy CM Devendra Fadnavis ) सरकार ३० जून रोजी अस्तित्वात आले. त्यानंतर ४० दिवसांनंतर अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार ( Cabinet Expantion ) झाला. परंतु, अजूनही खातेवाटप व पालकमंत्री वाटपावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू असून, पावसाळी अधिवेशन तोंडावर येऊन ठेपलेले असतानासुद्धा खातेवाटप न झाल्याने सरकारच्या एकंदरीत या कारभारावर शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनातून टीका ( Saamna Criticize on Shinde Government ) करण्यात आली आहे.
तीन दिवसांपूर्वी शिंदे फडवणी सरकार बिनमंत्र्यांचे होते. ४० दिवसानंतर कसाबसा मंत्रिमंडळाचा पाळणा हलला. दोन्हीकडच्या नाकीनऊ अशा एकूण १८ मंत्रांनी शपथ घेतली. मात्र, त्याला तीन दिवस उलटले, तरी अद्याप खाते वाटपाचे बारसे होऊ शकलेले नाही. कारण हे सरकार संधी साधूंचे आहे. ज्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली ते साधू बनल्याचे ढोंग करीत आहेत आणि मलाईदार खात्यापासून हवा तसा बंगला मिळावा यासाठी रस्सीखेच करीत आहेत. त्यामुळे बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे नामुष्की सरकार सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. काय म्हटले आहे सामनामधून पाहुया
पाळणा हलला, पण पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडेशिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पाळना 40 दिवसानंतर हलला खरा, पण आता त्याचे खातेवाटप लटकले आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटले आहेत. देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन तोंडावर आला आहे. पण, राज्याच्या मंत्रिमंडळाचे ना खातेवाटप झाले आहे, ना जिल्हा जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरले आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्ताराला 40 दिवस लागले आता त्यातील खाते वाटपासाठीसुद्धा घोळ सुरू आहे. 40 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा पाळणा हलला तेव्हा या पाळण्याची दोरी नेमकी कोणाकडे आहे? असा प्रश्न विचारला गेला होता. मात्र या पाळण्याला अनेक दौऱ्या आहेत आणि त्या आतल्या बाहेरच्या अशा अनेकांच्या हातात आहेत असे दिसत आहे. जे पाळण्यात आहे ते त्यांना हवे असलेल्या खात्यांसाठी तर ज्यांना पाळण्यात जागा मिळालेली नाही ते नाराजी व्यक्त करण्यासाठी हातातील दोरीला झटका देत आहेत.
धोका देणाऱ्यांचे राज्यशिंदे गटाला समर्थन देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही दोन दिवसांपूर्वी असा झटका दिला होता. बच्चू कडू हे ज्येष्ठ अपक्ष आमदार आहेत. आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही ते मंत्री होते. मात्र, शिंदे गटाने बंडखोरी केली तेव्हा त्यांना सुरुवातीपासून साथ देणाऱ्या अपक्ष आमदारांत ते अग्रेसर राहिले. त्यामुळे नव्या सरकारच्या पहिल्या पाळण्यात आपल्यालाही जागा मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे ते नाराज झाले आणि आपल्या या नाराजीचे अत्यंत कडू शब्दांत त्यांनी विद्यमान सत्याधारांना डोस पाजले.