मुंबई -शिवसेनेला विधानसभेत कामकाज सल्लागार समितीमध्ये स्थान न मिळाल्यामुळे ( Shiv Sena has no place in working advisory committee ) विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्ष नेेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट ( Shivsena NCP Congress met assembly speaker ) घेतली. त्यांनी शिवसेनेला कामकाज सल्लागार समितीमध्ये प्रतिनिधित्व ( Shiv Sena should give place in working advisory committee ) देण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण ( congress leader Ashok Chavan ) यांनी दिली. त्याचप्रमाणे या प्रकरणात शिवसेनेकडून लवकरच विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात ( Shivsenas letter to assembly speaker ) येणार आहे. यासोबतच विरोधी पक्ष सर्व बाबींवर कायदेशीर चर्चा करणार असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
पावसाठी अधिवेशनाचा कालावधी कमी-आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र मूळ अधिवेशन हे केवळ सहा दिवसच चालणार आहे. यामध्ये अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे नुकसान, पडझड हे प्रश्न देखील आहेत; त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी झालेला असून दोन ते तीन दिवस अधिवेशन वाढवावे, अशी मागणी विरोधी पक्षाने केली. त्यामुळे अजून एक कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्यानंतर अधिवेशन वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.