मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना नेते दोन वेगवेगळे दसरा मेळावे घेत आहेत. नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेची दसरा सभा होत आहे. त्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर दावा करणाऱ्या शिंदे गटाची मेळावा वांद्रे कुर्ला संकुलात होत आहे. यंदा 20 जून रोजी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंडखोरी झाली. त्यानंतर गेल्या चार महिन्यांत घडामोडींमध्ये झपाट्याने बदल झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तर शिंदे गट, भाजपने मिळून राज्यात सरकार स्थापन केले. मात्र यानंतर सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही, तो प्रश्न शिवसेना नेमकी कुणाची?
शिवाजी पार्कवरील मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. सारे मैदान तुडूंब भरले आहे. विशेषतः या कार्यकर्त्यांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे.काँग्रेसमध्ये दहा वर्षे राहून खासदारकी आणि आमदारकी उपभोगणाऱ्या नारायण राणे यांनी हिंदुत्वावर बोलू नये. किरण पावसकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीचे चॉकलेट घेतले. त्यांनीही हिंदुत्वावर बोलू नये, सुषमा अंधारे यांची टीका. तुमचे हिंदुत्व ईडीच्या कार्यालयात जागृत झालेले आहे. शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका.मुंबई महाराष्ट्रात रहावी वाटत असेल, तर सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही सुभाष देसाई यांनी यावेळी केले.