महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती

तिरुपती देवस्थान ट्रस्टमध्ये शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते.

tirupati trust news
tirupati trust news

By

Published : Sep 16, 2021, 12:48 PM IST

मुंबई -देशातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून तिरुपती देवस्थानाला ओळखले जाते. या मंदिराच्या ट्रस्टमध्ये शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. यात महाराष्ट्रातून नार्वेकर यांचे नाव आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुचवले नाव -

या ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून नियुक्त होण्यासाठी मोठी चढाओढ असते. देशभरातून अनेक शिफारस येत असतात. मात्र, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना फोन करून याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर नार्वेकर यांचे नाव अधिकृत जाहीर करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश सरकारने त्याप्रमाणे काल अधिकृत अधिसूचना काढत तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नवीन सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली. नार्वेकर यांच्या खांद्यावर देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे देश पातळीवर विस्तार वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर -

मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेतील एक मोठे नाव आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे ते सहकारी आहेत. त्यांचा प्रवासही तितकाच रंजक आहेत. एक साधा गट प्रमुख ते शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली होती.

हेही वाचा-आयकर विभागाकडू सोनू सूदच्या घराची तब्बल 20 तास झाडाझडती, मात्र हाती काय लागले याची सर्वत्र चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details