मुंबई - मराठी माणसाची शिवसेना आहे. प्रसारमाध्यमातून फक्त भाजपाचीच भूमिका मांडली जात आहे. अशी भूमिका ही नितीन देशमुख यांनी मांडली तर महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे ही त्यांची भूमिका आहे. त्यांनी आपली भूमिका शिवसेना पक्षप्रमुखासमोर आपले म्हणणे मांडावे. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा, असे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना आवाहन केले आहे.
मुंबईत नितीन देशमुख यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, निलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आपल्यासोबत झालेला घटनाक्रम सांगितला. त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे यांनी त्यांना कश्याप्रकारे बैठकीला बोलवले आणि ते कश्याप्रकारे गुजरातच्या दिशेने गेले. त्यांना वाटेत कश्याप्रकारे शंभूराजे देसाई आणि संदिपान भुमरे हे भेटले.
राऊतांचे मोठे वत्कव्य - या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या संजय राऊत यांनी यावेळी मोठे विधान केले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना घेऊन 24 तासांत दाखल व्हावे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांसमोर आपली बाजू मांडावी. त्यावर विचार केला जाईल. जर ते आले तर तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेना तयार आहे.