महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हाथरस प्रकरणी मुंबईत शिवसेनेची निदर्शने.. यूपीमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी - शिवसेना हाथरस केस

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे युवतीवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने दादर शिवाजी पार्क येथे जोरदार निदर्शने  करून सामूहिक बलात्कार घटनेचा निषेध केला.

Shiv Sena protests in Mumbai
हाथरस प्रकरणी मुंबईत शिवसेनेची निदर्शने

By

Published : Oct 3, 2020, 3:15 PM IST

Updated : Oct 3, 2020, 3:38 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे युवतीवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने दादर शिवाजी पार्क येथे जोरदार निदर्शने करून सामूहिक बलात्कार घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर यूपीमध्ये राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी केली. यावेळी आमदार सदा सर्वणकर, मनीषा कायंदे, नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत

हाथरस प्रकरणी मुंबईत शिवसेनेची निदर्शने

दरम्यान या प्रकरणी योगी सरकारने पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, पोलीस निरीक्षकासह इतर अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एवढंच नाही तर हाथरस प्रकरणात पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षक या दोघांचीही नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी केली जाणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

Last Updated : Oct 3, 2020, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details