मुंबई - शिवसेना राऊत यांच्या पत्नी राऊत मुंबईतील ईडी कार्यालयात भेटल्या. आज त्यांची चौकशी होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एकीकडे गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे ईडीने राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यामुळे संजय राऊतांपाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Case) चौकशी होणार आहे. आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ED कडून निर्देश देण्यात आले आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही आज ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते व आज त्या त्या ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची चौकशीसाठी कोठडी ८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजाण्यात आले. आज त्यांना चौकशीसाठी बोलवल्या नंतर वर्षा राऊत या ईडी कार्यालयात दाखल झालेल्या आहेत. या ईडी कार्यालयात तिसऱ्या मजल्यावर संजय राऊत यांना ठेवण्यात आलेले आहे.
प्रवीण राऊत यांच्याकडील पैशांमधून मालमत्ता खरेदी -गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाला प्रकरणांमध्ये या अगोदर प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांच्याकडे ११२ कोटी रुपये असल्याचे समोर आलं होतं. त्यापैकी १ कोटी ६ लाख रुपये हे प्रवीण राऊत यांच्या खात्यावरून खासदार संजय राऊत व त्यांच्या पत्नी वर्ष राऊत यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते. त्याचबरोबर एका अनोळखी व्यक्तीकडून १ कोटी ८ लाख रुपये सुद्धा संजय राऊत व त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाले होते. या प्रकरणाची सुद्धा चौकशी आज होणार आहे. त्याचबरोबर जमिन व फ्लॅट या अगोदरच ईडीने जप्त केले आहेत. परंतु प्रवीण राऊत यांच्याकडून भेटलेल्या पैशानंतरच राऊत दाम्पत्यांनी ही मालमत्ता खरेदी केली गेल्याचा आरोप होत आहे. त्यासंदर्भामध्ये ही आज चौकशी सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.