मुंबई -राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून विषय संपलेला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्यासाठी राज्यसभेवर 42 मतांची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली होती. याबाबतची ऑफरही संभाजीराजेंना देण्यात आली. शिवसेना ही शिवसेनेच्या ( Shiv Sena ) धोरणानुसारच वागली. तसा प्रस्ताव संभाजीराजे यांच्या समोर ठेवण्यात आला होता. आता संभाजीराजे ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांना आमच्या शुभेच्छा आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी खंत संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती.
Sanjay Raut : 'राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आमच्याकडून विषय संपला'
शिवसेना ही शिवसेनेच्या ( Shiv Sena ) धोरणानुसारच वागली. तसा प्रस्ताव संभाजीराजे यांच्या समोर ठेवण्यात आला होता. आता संभाजीराजे ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांना आमच्या शुभेच्छा आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) म्हणाले.
Sanjay Raut
संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत प्रेम, आदर, आस्था आम्हाला आहे. मात्र राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत आम्हाला आता जास्त भाष्य करायचे नाही. संभाजीराजे यांना निवडणूक लढवायची असल्यास त्यांना कोणत्या तरी पक्षाचा आधार घ्यावाच लागेल, असे यावेळी संजय राऊत म्हणाले. तसेच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक झाली तरी, जागेसाठी शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल. यासाठी महाविकास आघाडीकडे आवश्यक ती मते असल्याचा पुर्नरुच्चार संजय राऊत यांनी केला.
Last Updated : May 27, 2022, 5:03 PM IST