मुंबईशिवसेना नेते संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे. राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र याच प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीनावर सुनावणी सुरू असल्याने प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 27 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर स्वातंत्र्य सुनावणी घेण्यात यावी, असे संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांच्या वकिलाने सांगितले आहे. आज सुनावणी होऊ शकली नाही. सुनावणी करता प्रत्यक्ष हजर राहण्याकरिता संजय राऊत अर्थार रोड कारागृहातून ( Arthur Road Jail ) निघाले. मात्र ट्राफिकमुळे संजय राऊत यांना न्यायालयात पोहोचायला उशीर झाला होता.
पीएमएलए कोर्टात सुनावणी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार होती. परंतु वाहतूक कोंडीमुळे राऊत यांना कोर्टात पोहचायला उशिर झाला. संजय राऊतांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जवळजवळ दीड तास उशिराने हजर करण्यात आले आहे. पण यापूर्वीच संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून निश्चित करण्यात आलं होतं.
संजय राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत सोमवारी 19 सप्टेंबरला एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाकडून संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवली. आता संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. 1,039.79 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा या आरोपपत्रातून ईडीने केला आहे.