मुंबई -शिवसेना आमदारांची महत्वपूर्ण बैठक 22 नोव्हेंबरला मुंबईत दुपारी बारा वाजता मातोश्रीवर होत आहे. या बैठकीला येताना आमदारांना आधारकार्ड, ओळखपत्रासह 5 दिवसांचे कपडेही घेऊन या असे आदेश शिवसेना भवनातून आमदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदारांना पुन्हा पक्षाच्या नजरकैदेत राहावे लागणार आहे.
शिवसेना आमदार पुन्हा हॉटेलमध्ये होणार नजरकैद
शिवसेना आमदारांची महत्वपूर्ण बैठक २२ नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीनंतर आमदारांना पुन्हा हॉटेलवर ठेवले जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना आमदार पुन्हा हॉटेलमध्ये होणार नजरकैद
बैठकीत आमदारांना खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीनंतर या आमदारांना कदाचित मुंबई ठाणे अथवा अलिबाग इथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वीही शिवसेनेने आमदारांना बैठकीनंतर प्रथम रंगशारदा व नंतर मालाडच्या द रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले होते. या बैठकीत सत्ता पेचावर चर्चा होणार असल्याने शिवसेनेच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.