मुंबई -शिंदे फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Government ) स्थापन झाल्यानंतर या सरकारने विकास कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे. भाजपच्या काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना पुन्हा हिरवा कंदील दाखवल्यानंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांच्या मतदारसंघात जोमाने कामे दिली जात आहेत, मात्र काही विशिष्ट आमदारांना कामे दिली जात असल्याबाबत विचारले असता आमदारांचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास अशी प्रतिक्रिया माजी मंत्री उदय सामंत यांनी दिली ( Uday Samant On MLA Fund ) आहे. आमदारांच्या विकासामुळेच महाराष्ट्राचा विकास होणार आहे, त्यामुळे यात काहीही गैर नाही असे सामंत ( Uday Samant on Maharashtra Development ) म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा -मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 30 आणि 31 रोजी ते नाशिक, औरंगाबाद आणि पुणे या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत. सिल्लोड येथून या दौऱ्याला सुरुवात होऊन पुणे जिल्ह्यात विभागीय आढावा बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. मात्र केवळ बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातच हा दौरा आहे का असे विचारले असता अन्य आमदारांच्या मतदार संघातूनही जात आहोत, असे उत्तर देत सामंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.