महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ravindra Waikar ED Inquiry : शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून 8 तास चौकशी - Ravindra Waikar interrogation by ED

शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे रविंद्र वायकर ( Ravindra Waikar interrogation by ED ) यांची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केली आहे. नेमक्या कुठक्या प्रकारणात ही चौकशी झाली अद्याप स्पष्ट होऊल शकलं नाही. जोगेश्वरी मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत.

रविंद्र वायकर
Ravindra Waikar

By

Published : Dec 22, 2021, 11:51 AM IST

Updated : Dec 22, 2021, 1:01 PM IST

मुंबई -शिवसेना आमदाररविंद्र वायकरयांची ईडीने ( Ravindra Waikar interrogation by ED ) तब्बल 8 तास चौकशी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईडी चौकशीचं नेमकं कारण काय होतं, यावरुन तर्कवितर्कांना उधाण आलंय. मात्र अद्यात या चौकशीबाबात कमालीची गुप्तता बाळगण्यात आली असून कोणत्या प्रकरणी रविंद्र वायकर हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते, हे कळू शकलेलं नाही. जोगेश्वरी मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत.

रविंद्र वायकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. वायकर हे फडणवीस सरकारच्या काळात गृहिनिर्माण मंत्री होते. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीय सोमय्या यांनी रविंद्र वायकर यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करत जमिनीबाबत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर वायकर यांनी सोमय्यांना मानहानीची नोटीस पाठवली होती. या सर्व घडामोडींनंतर आज अचानक वायकरांची ईडी चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा -LIVE : हिवाळी अधिवेशन 2021 - विधानसभा कामकाजाचे थेट प्रक्षेपण

Last Updated : Dec 22, 2021, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details