मुंबई : एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे तब्बल 40 आमदार फुटले. यात सर्वाधिक संख्या होती ती कोकणातील आमदारांची. शिवसेना उभी राहिली ज्या कोकणाला शिवसेनेचा पाया मानला जातो. त्याच कोकणात शिवसेना फुटल्याने आता उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यासमोर पक्ष बांधण्याच मोठ आव्हान उभ आहे. त्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे अध्यक्ष व माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Yuva Sena President Aditya Thackeray ) सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या निष्ठा यात्रेचा पाचवा टप्पा आता ( Aditya Thackeray on Loyalty Yatra ) कोकणात रत्नागिरीत असून थेट मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांच्या मतदारसंघातून ते त्यांना आव्हान देणार आहेत. त्याचबरोबर सध्या शिंदे गटाकडून शिवसेनेचे आणखी आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केला जात आहे. यात प्रकर्षण नाव येते ते याच कोकणातील आमदार राजन साळवी यांचे.
MLA Rajan Salvi : शिवसेना आमदार राजन साळवी शिंदे गटात सामील? पहा काय म्हणाले राजन साळवी - Shiv Sena MLA Rajan Salvi
आदित्य ठाकरे ( Yuva Sena President Aditya Thackeray ) सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या निष्ठा यात्रेचा पाचवा टप्पा आता ( Aditya Thackeray on Loyalty Yatra ) कोकणात रत्नागिरीत आहे. यावेळी बोलताना आमदार राजन साळवी ( MLA Rajan Salvi ) म्हणाले की, आदित्य ठाकरे त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात युवक वर्ग मार्गक्रम करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांच्या स्पर्शाने आम्ही पावन झालो आहोत.
...तर राजन साळवी शून्य -यावेळी बोलताना आमदार राजन साळवी ( MLA Rajan Salvi ) म्हणाले की, "महाराष्ट्रात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात युवक वर्ग मार्गक्रम करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांच्या स्पर्शाने आम्ही पावन झालो आहोत. पहिल्यापासून आतापर्यंत आम्ही शिवसेनाप्रमुखांशीच प्रामाणिक आहोत. अशा प्रकारच्या अनेक चर्चा होत असतात शिवसेनेतून राजन साळवी नाव काढले तर, राजन साळवी शून्य आहे. रिफायनरी प्रकल्प हा विषय वेगळा आहे. आम जनतेचा पाठिंबा असेल आम जनतेची मागणी असेल तर प्रकल्प होईल." असं वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना केले आहे.