महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Uday Samant Attacked BJP : मुंबई विद्यापीठाच्या भूखंडावरुन शिवसेना भाजपमध्ये जुंपली; शिक्षणमंत्र्यांनी सुनावले खडेबोल

मुंबई विद्यापीठाच्या भूखंडावरील एसआरए प्रकल्प बंद ( SRA Project In Mumbai University ) पाडला. यामुळे भाजपला पोटदुखी झाली असून भूखंड हडप केल्याचा आरोप करत आहे. तसा कोणताच निर्णय घेतलेला नाही. भाजपने आरोप सिध्द करावेत, राजीनामा देण्यास मी तयार आहे, अशी ठाम भूमिका शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ( Minister Uday Samant Mumbai University Land ) पत्रकार परिषदेत मांडली. कुलगुरू पदाच्या निवडीवरून देखील सामंत यांनी भाजपला खडेबोल ( Education Minister On Mumbai SRA Project ) सुनावले.

Uday Samant Attack BJP
शिक्षणमंत्री उदय सामंत

By

Published : Dec 16, 2021, 7:47 PM IST

Updated : Dec 17, 2021, 3:38 PM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या भूखंडावरुन शिवसेना भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठाचा भूखंड हडप करण्यासाठी कुलगुरू आणायचे आहेत, असा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केला होता. याला शिवसेनेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर ( Uday Samant Press conference in mumbai ) दिले आहे. मुंबई विद्यापीठाच्या भूखंडावरील एसआरए प्रकल्प बंद पाडला. यामुळे भाजपला पोटदुखी झाली असून भूखंड हडप केल्याचा आरोप करत ( Uday Samant on Mumbai University land ) आहे. तसा कोणताच निर्णय घेतलेला नाही. भाजपने आरोप सिध्द करावेत, राजीनामा देण्यास मी तयार आहे, अशी ठाम भूमिका सामंत यांनी पत्रकार परिषदेत मांडली. कुलगुरू पदाच्या निवडीवरून देखील सामंत यांनी भाजपला खडेबोल ( Education minister about VC selection ) सुनावले.

'विद्यापीठाच्या जागा शैक्षणिक कामांसाठीच'

राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपालांच्या अधिकारावर गदा आणण्याचा निर्णय पारित केला आहे. सरकारला भूखंड गिळंकृत करायचे असल्याने कुलगुरू पद निवडीचा निर्णय घेतला आहे, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. शिवसेनेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई विद्यापीठाच्या जागेवर एसआरए प्रकल्प सुरु होता, तो बंद पाडला. यामुळे भाजपाचे पोटशूळ उठल्याने सरकारवर आरोप करत सुटले आहेत. राज्यातील विद्यापीठाच्या जागा शैक्षणिक कामासाठीच वापरल्या जातील. कुणालाही बंगला बांधायला देणार नाही, असे उदय सामंत यांनी ठणकावले.

'शेलार यांनी केंद्राला जाब विचारावा'

केंद्र सरकारच्या कॅबिनेटमधून ज्या पध्दतीने कुलगुरु नेमले जातात. त्याच धोरणाचे आम्ही अनुकरण करत आहोत. राज्यपालांचे अधिकार यामुळे कमी होणार नाहीत. कुलगुरूंची नेमणूक तेच करतील. ही प्रक्रिया पारदर्शक असेल, कुणाशी तरी तुलना करून कुलगुरू होणाऱ्यांचा अपमान करू नये, अशा शब्दांत सामंत यांनी शेलार यांना खडसावले. तसेच महाराष्ट्रातच प्र-कुलपती घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. भाजपशासित राज्यांमध्येही प्र-कुलपती आहेत. शेलार यांनी केंद्राला याबाबत जाब विचारावा, असा खोचक टोलाही लगावला.

मनसेचे नेते पानसे यांची भेट वैयक्तिक -

मनसे नेते अभिजीत पानसे यांनी मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली. राज्यात बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे. सामंत यांनी भेटीबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, अभिजीत पानसे मनसेचे नेते आहेत. त्यांच्या वडिलांच्या एका कार्यक्रमाला निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. बाहेर त्यांनी काय सांगितले हे मला माहित नाही, असेही सामंत म्हणाले.

आयोगाचा निर्णय महत्वाचा -

निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकारने आपला ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे. निवडणूक आयोग याबाबत जो निर्णय घेईल तो महत्त्वाचा आहे, असे सामंत म्हणाले.

सरकारला बदनाम करण्यावर भर -

भाजपकडून गेली दोन वर्षे आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रकार आहे. आताही पार्टीवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. परंतु, महापालिकेने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वीही असेच आरोप केले होते. त्यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा -Bullock Cart Race Maharashtra : बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार; सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

हेही वाचा -Maharashtra SSC HSC Exam 2022 Schedule - इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 'या' आहेत तारखा

Last Updated : Dec 17, 2021, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details