सुरत (गुजरात) -शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवी पाठक सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले जेथे काही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते थांबलेले आहेत. ( Milind Narvekar Going Meet Eknath Shinde )
राठोड आणि मिलिंद नार्वेकर यांची झाली होती बैठक -विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीत राजकीय भूकंप होईल याची कोणाला शक्यताही वाटली नव्हती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी काही आमदारांना घेऊन बाहेर पडले. तेव्हापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या तीन प्रमुख आमदारांनी मध्यस्थीची भूमिका निभावत वर्षावरील बैठकीत उपस्थित होते. यात चर्चेसाठी शिवसेनेच्यावतीने मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक उपस्थित होते. तर एकनाथ शिंदेच्या वतीने दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर हे आमदार बैठकीला उपस्थित होते.