मुंबई -मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरूच (IT Raid On Yashwant Jadhav Home ) आहे. आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मारून बसले आहेत. मध्यरात्रीच्या वेळीत यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढल्याचे समजल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र झाले. शिवसैनिकांनी आयकार विभागाच्या (IT Raid On Yashwant Jadhav Home) छापेमारीच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्थानिक पोलिसांनी त्यांना शांत केले तरी रात्रभर शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घराबाहेर बसून राहिले. दरम्यान, आज सोमवारी चौथ्या दिवशी आयकर विभागाची धाड संपली आहे या धाडी दरम्यान आयकर विभागाने बँक खाती, आणि आर्थिक व्यवहाराची तपासणी केल्याची माहिती मिळत आहे.
काय आहेत आरोप -
यशवंत जाधव यांच्या माझगावमधील दोन घरांसह मुंबईत २५ ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. यशवंत जाधव त्यांचे पीए, पालिकेतील कंत्राटदार यांच्या मुंबईतील एकूण २५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. माझगाव, काळाचौकी, मालाड, बोरिवली, मुलुंड आदी ठिकाणी या धाडी प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. (Yashwant Jadhav's financial transactions investigated) यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी (२०१९)च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याने निवडणूक आयोगाने आयकर विभागाला चौकशी करण्यास सांगितले होते. तसेच भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लाँडरिंग आणि १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
आर्थिक व्यवहार याची झाडाझडती