मुंबई - शिवसेना नेते व खासदार संजय राऊत व भाजप नेते किरीट सोमैया यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत ( Sanjay Raut On Kirit Somaiya ) आहे. दोन्ही नेते एकमेकांची जुनी प्रकरणे सध्या बाहेर काढत आहेत. खासदार राऊत यांनी सोमैया कुटुंबीयांच्या युवक प्रतिष्ठान ( Sanjay RautOn Yuvak Pratishthan ) या संस्थेवर खंडणी वसुलीचा आरोप केला. या विरोधात किरीट सोमैया आज राऊतांवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुलुंड पोलीस ठाण्यात गेले ( Kirit Somaiya going mulund police station ) आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून 'जास्त फडफडू नका सगळे पीस गळून पडतील' असा थेट इशारा सोमय्या यांना दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले राऊत ? - "ज्या ज्या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या त्या व्यक्तीकडून किरीट सोमैया यांच्या खाजगी ट्रस्टला कोट्यावधी रुपये देण्यात आलेत. हा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा प्रयत्न तर नाही ना ? याची चौकशी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत. हे शहर आमच्या बापाच आहे. तुमच्या नाही. तुम्ही मुंबईला लुटत आहात." असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.