महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut : चंद्रकांतदादा, 'शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय' : राऊतांचा पलटवार - Sanjay Raut Replied Chandrakant Patil

शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना प्रत्त्युत्तर दिले ( Sanjay Raut Replied Chandrakant Patil ) आहे. राऊत नेहमी माझी चेष्टा करतात. मात्र, हेच त्यांच्या अंगावर येणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले ( Chandrakant Patil on Sanjay Raut ) होते. त्यावर राऊत यांनी ट्विट करत उत्तर दिले.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Mar 27, 2022, 10:05 PM IST

मुंबई : नेहमी संजय राऊत हे माझी चेष्टा करत असतात. मात्र, हेच त्यांच्या अंगावर येणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले ( Chandrakant Patil on Sanjay Raut ) होते. एका अर्थाने पाटील यांनी राऊत यांना इशाराच दिला होता. आता त्यावर संजय राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादा, शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय, अशा शब्दात राऊत यांनी पाटलांवर निशाणा साधला ( Sanjay Raut Replied Chandrakant Patil ) आहे.

संजय राऊत म्हणाले : 'नव्या धमकी बद्दल धन्यवाद. महाग पडेल म्हणजे? Ed कडून आणखी एक खोटे कांड करणार. बदनामी मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत जी भाषा तुम्ही वापरता. चेष्टा करता, ते सहन करायचे? शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय.'

चंद्रकांत पाटील म्हणाले होते : शिवसेना नेते तथा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Shivsena Leader Yashwant Jadhav ) यांच्या घरी आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत एक महत्वपूर्ण डायरी हाती लागली आहे. या डायरीमध्ये 'मातोश्री' नावाने दोन कोटी साठ लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता विरोधक ही आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp State President Chandrakant Patil ) यांनी अजून खूप काही होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या चौकशीतुन आता कुणी सुटणार नाही, असेही ते म्हणाले. नेहमी संजय राऊत हे माझी चेष्टा करत असतात. मात्र, हेच त्यांच्या अंगावर येणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यांनी सामना वाचणेही बंद केले असल्याचे ते म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details