महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेना नेते संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज - संजय राऊत डिस्चार्ज न्यूज

संजय राऊत यांच्यावर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी तीन स्टेन टाकण्यात आले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी तो स्टेन काढून त्याजागी नवा स्टेन टाकला आहे.

Shiv Sena leader Sanjay Raut discharged from hospital
शिवसेना नेते संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

By

Published : Dec 5, 2020, 3:33 PM IST

मुंबई -शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते व सामना दैनिकाचे संपादक संजय राऊत यांना सकाळी ११च्या दरम्यान लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर पुढील दोन दिवस संजय राऊत घरीच आराम करणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

हेही वाचा -मॅच फिक्सिंग : युक्रेनच्या टेनिसपटूवर आजीवन बंदी

संजय राऊत यांच्यावर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी तीन स्टेन टाकण्यात आले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी तो स्टेन काढून त्याजागी नवा स्टेन टाकला आहे. बुधवारी (२ डिसेंबर) लीलावती रुग्णालयात डॉ. मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी संजय राऊता यांना आराम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस ते घरीच आराम करतील. यानंतर सोमवारपासून (८ डिसेंबर) ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना ऑफिसला जातील.

ABOUT THE AUTHOR

...view details