मुंबई -राज्यात सध्या भ्रष्टाचाराचा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून रान पेटले आहे. विरोधकांनी महाविकासआघाडीला विशेषता शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही सभांचे सत्र सुरू करून महाविकासआघाडीला आणि मुख्य म्हणजे शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. शिवसेनेच्या खासदार यांनी याबाबत नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबवून विरोधकांच्या या प्रयत्नांना जोरदार उत्तर द्यायचा निर्णय घेण्यात ( Sanjay Raut criticized opposition on issue of Hindutva and rallies) आला आहे.
शिवसेनेची पहिली सभा बीकेसीत -विरोधकांच्या सभांना जोरदार उत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही आता भव्य सभा मुंबईतील बीकेसी येथील घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली असून येत्या १४ मे ला ही सभा होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली ( Sanjay Raut On Rally ) आहे. यासंदर्भात शिवसेना भवनात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेला प्रतिहल्ला करावाच लागेल शिवसेना गप्प बसणार नाही असा निर्धारच या बैठकीत करण्यात आला असून तसा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे.