मुंबई -शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये ( Special PMLA Court ) युक्तिवाद करण्यात आला. त्यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग ( Solicitor General Anil Singh ) यांनी असा युक्तिवाद केला. संजय राऊत यांच्या पत्नीला देण्यात आलेले 55 लाख रुपयांची रक्कम ईडीच्या वतीने समान देण्यात आल्यानंतर परतवण्यात आले होती. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी पत्राचा प्रकरणात अनेक बैठकी घेतल्या तसेच प्रवीण राऊतच्या माध्यमातून संजय राऊत सर्व प्रकरण हाताळत होते असा देखील आरोप अनिल सिंग यांनी केला आहे.
उद्या होणार युक्तिवाद - संजय राऊत त्यांच्या जामीन अर्जावर आज ईडीच्या वतीने युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे उद्या मंगळवार दिनांक 18 रोजी संजय राऊत यांच्यावतीने वरिष्ठ वकील अशोक मुंडरगी हे युक्तिवाद करणार ( Sanjay Raut Hearing ) आहे. सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उद्या वकील अशोक मुंडरगी उत्तर देणार असून उद्याला ठरणार आहे की संजय राऊत यांचे दिवाळी कारागृहामध्ये होणार की कुटुंबियांसोबत होणार त्यामुळे राऊत यांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर इतकी वादा दरम्यान अनिल सिंग यांनी संजय राऊत यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मनी लॉन्ड्री प्रमाणे हा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. संजय राऊत यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला तर, या प्रकरणातील इतर साक्षीदारांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या मेघा पाटकर यांना संजय राऊत यांनी धमकी दिल्या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल आहे. संजय राऊत यांना कारागृहामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डॉक्टरांच्या सल्लागाराने वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहे. राऊत यांना वैद्यकीय स्वरूपात जामीन हवा आहे तर त्यांनी त्या स्वरूपात अर्ज करायला पाहिजेत असे देखील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद दरम्यान म्हटले आहे.
वकील अनिल सिंग यांचा युक्तिवाद
चंदन केळकर यांचा जबाब नोंदवला आहे, पत्राचाळ प्रकल्पाशी निगडित ते काम करतात. प्रवीण राऊत हे बहुतांश वेळा म्हाडा अधिकाऱ्यांशी बातचीत करत, मात्र परवानगी साठी संजय राऊत आणि राकेश वाधवान यांची मदत घेत असे. प्रवीण राऊत आणि संजय राऊत लायझिंग वर्कमध्ये व्यस्त असे, 30 लाख रुपये वर्षा राऊत यांना आम्ही दिले.