मुंबई - राज्यसभेत आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत खडा टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. पण आम्हाला आत्मविश्वास आहे की राज्यसभेच्या निवडणुकीतूनच हे स्पष्ट होईल की, संख्याबळ कोणाकडे आहे. त्यामुळे दहा तारखेलाच हे स्पष्ट होईल, की बहुमत कोणाकडे आहे, असे शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर यांनी सांगितले. विधान भवनात शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी नामांकन अर्ज आज दाखल ( aamsha padvi filed MLC Election candidate application ) केला. त्यापूर्वी अहिर विधान भवनात प्रसारमध्यामांशी बोलत होते.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पक्ष वाढविणार - मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी माझी निवड करण्यात आली आहे. तर आदिवासी भागातील शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी पाडवींची निवड झाली आहे. या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन काम करण्यास आम्हाला सांगण्यात आले आहे. माझ्या प्रशासनाच्या अनुभवाचा फायदा घेऊन वरळी आणि महाराष्ट्राच्या कानाकोरपऱ्यात पक्ष कसा घेऊन जाता येईल यासाठी माझा प्रयत्न राहिल, असेही अहिर म्हणाले.