मुंबई - महाराष्ट्रात सध्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. कोण कुणाची मते फोडणार? महाराष्ट्र घोडेबाजार होणार का? या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून भाजपवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप होत आहे. तसेच भाजप अपक्ष मते फोडण्यासाठी केंद्रीय यंत्रांचा वापर करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी 'लक्षात ठेवा आमच्याकडे देखील सत्ता आहे' असा थेट इशारा भाजपला दिला आहे. ( MP Sanjay Raut On BJP about Rajya Sabha Election 2022 )
हेही वाचा -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोनावर अवलंबून -वडेट्टीवार
कोणी कुणाला रोखु शकत नाही - "राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळणारी व्यक्ती मॅच्युअर्ड असायलाच पाहिजे. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. आमचे काही प्रमुख लोक जाऊन आले आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. भाजपने ठरवले आहे की, त्यांनी निवडणूक लढायची तर निवडणूक लढायची म्हटल्यावर राजकारणात कोणी कोणाला रोखू शकत नाही. पण, जर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केला असेल तर अर्थात महाविकास आघाडी सुद्धा राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही देखील तेवढेच मजबुतीने निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेसाठीचा आहे. आता सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष, अपक्ष आणि इतर काही पक्षांवर अवलंबून आहे."